रविवार, २९ मार्च, २०२०

मोटारीची काळजी घ्या, अन्यथा बसेल फटका


कोरोनाच्या संकटामुळे सध्या नागरिकांना घरातच बसून राहावे लागत आहे. प्रशासनाने वाहतूक बंदीची अंमलबजावणी सुरू केली असल्याने नागरिकांची वाहने एकाच ठिकाणी थांबून आहेत. वास्तविक आठवड्यापेक्षा जास्त काळ गाडी एकाच ठिकाणी थांबून असेल तर बॅटरी उतरण्याची शक्यता असते. परिणामी ती सुरू होऊ शकत नाही. तसेच व्हील अलाइनमेंटवरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बंद मोटारींची काळजी वेळेत घेतली तर आर्थिक भुर्दंड वाचू शकतो. शिवाय त्रास हा वेगळाच. ऐनवेळी उपयोगी येणारी गाडी जर उपयोगी पडत नसेल तर त्याचा काय त्रास होतो, याची कल्पना वाहनधारकांना आहे.
त्यामुळे मोटारीची काळजी अशावेळी घेणे गरजेचे आहे. वाहन चालू स्थितीत राहण्यासाठी किमान दर दोन-तीन दिवसांनी मोटार किमान पंधरा मिनिटे सुरू ठेवावी. मोटार शक्यतो शेडमध्ये उभी करावी, नसेल तर तिच्यावर कव्हर टाकावे. मोटार बंद करून ठेवताना आतमधून स्वच्छ करावी तसेच सॅनिटायझरचा स्प्रे फवारणी करावी किंवा त्याद्वारे स्वच्छ केल्यास उत्तमच. मोटार एका जागेवर आठ दिवसांपेक्षा जास्त काळ उभी असल्यास अधून-मधून ती मागेपुढे करावी म्हणजे टायरवर परिणाम होत नाही. मोटार एकाच जागेवर अनेक दिवस उभी करायची असल्यास आपल्याला काळजी घ्यायला हवीच. दहा पंधरा मिनिटे त्यासाठी वेळ द्यायला हवा.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा