गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

कामगार मंडळाकडील ९५00 कोटी थेट मजुरांच्या खात्यात वळते करा

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी व राज्यातील जनसामान्यांचे जीवन वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्या तातडीने योजनांची अंमलबजावणी केली, ती कौतुकास्पद आहे. परंतु जेव्हापासून राज्यासह संपूर्ण देशात 'लॉकडाऊन'करण्यात आले तेव्हापासून बांधकाम व इतर असंघटित मजुरांचे खूप हाल होत आहेत. बांधकामे व अन्य सर्व कामे थांबली आहेत. या क्षेत्रातील हे बहुतांश मजूर रोजंदारीवर काम करणारे असतात. मोठय़ा प्रमाणात त्यांची रोजी बुडाली आहे.
अशा परिस्थितीत या कामगारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ आणि माथाडी कामगार कल्याण मंडळाच्या अधीन जमा असलेले ९ हजार ५00 कोटी रुपये हे या हवालदिल कामगार व मजुरांच्या खात्यात 'थेट लाभ हस्तांतरण' (डीबीटी)द्वारे जमा करण्यात यावे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. बांधकामांची कामे थांबली आहे. याचा विपरीत परिणाम मजुरांच्या रोजगारावर झाला आहे.रोजगार बुडाला आहे.  आजच्या अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांना दिलासा देणे फार गरजेचे आहे. यामुळेच या कामगारांना बांधकाम कामगार कल्याण महामंडळामार्फत मदत दिली जावी, असे आवाहन केंद्र सरकारनेदेखील केले आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ आणि माथाडी कामगार कल्याण मंडळाच्या अधीन जमा असलेले ९ हजार ५00 कोटी रुपये हे या हवालदिल कामगार व मजुरांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)द्वारे जमा करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधीन असलेल्या अशा सर्व महामंडळांकडे सध्या जवळपास ८ हजार २00 कोटी रुपये (सप्टेंबर २0१९ अखेर) जमा आहेत. त्यातून ८३0 कोटी रुपये खर्च होईल, असे अवजारे व साहित्याचे कंत्राट दिलेले आहे, परंतु आता त्याची या भीषण अडचणींचे काळात तितकी आवश्यकता राहिली नाही. हे सर्व कंत्राट तातडीने रद्द करून, तो पैसा मजुरांचे कामी येऊ शकतो. यानुसार महामंडळाकडे ८000 कोटी रुपये जमा आहेत तसेच माथाडी कामगार कल्याण मंडळ यांचे विभिन्न क्षेत्रीय कार्यालये यांचे जवळ १५00 कोटी पडून आहेत. असे एकूण ९५00 कोटी आपण मोठा दिलासा देण्यासाठी योग्य मदतीसाठी आता वापरू शकतो. राज्यातील या क्षेत्रातील कामगारांची संख्या १५ लाखांच्या घरात आहे. केंद्राच्या सूचनेनुसार, राज्य सरकारांनी हा पैसा कामगारांकडे वळता करणे आवश्यक आहे. तसे केल्यास प्रत्येक कामगाराला किमान २५ हजार रुपये अनुदान मिळू शकेल. ते या हवालदिल कामगार व मजुरांसाठी या अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत तातडीने कामी येऊ शकतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा