शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

निराशेतून बाहेर या

निराशा ही एक भावावस्था आहे, मात्र ती बराच काळ रेंगाळते तेव्हा आजारात परावर्तीत होते. दुखद बाब म्हणजे अलिकडे देशात नैराश्यग्रस्तांच्या संख्येत वाढ नोंदविली जात आहे. नैराश्यामुळे अपंगत्त्व येणार्‍या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. २0२0 पर्यंत नैराश्य हे अपंगत्त्व येण्याचं दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.  नैराश्य हा गंभीर मानसिक विकार आहे. पण याकडे निर्मळतेनं पाहिलं जात नाही. त्यावर योग्य उपचार घेतले जात नाहीत. नैराश्याची लक्षणं व्यक्तीसापेक्ष बदलत जातात.
थकवा, निरुत्साह, अंगदुखी, झोप न लागणं, भुकेच्या चक्रात बदल होणं, आत्मविश्‍वासाची कमतरता, लक्ष केंद्रित न होणं, सतत दु:खी राहणं अशी लक्षणं नैराश्य दर्शवतात. स्वत:मध्ये किंवा जवळच्या व्यक्तींमध्ये अशी लक्षणं दिसू लागली तर तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सतत रडत राहणं,आत्मविश्‍वास हरवल्यासारखं वाटणं, कशातच लक्ष न लागणं अशी लक्षणं आढळून आली तर नैराश्य आहे, असं म्हणता येईल. आपल्यासोबत या गोष्टी घडत आहेत का, याचा विचार करावा. स्वत:मधील नैराश्य आपल्याशिवाय दुसरं कुणीही ओळखू शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तरच प्रश्न सुटेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा