गुरुवार, २ एप्रिल, २०२०

समाजकार्य करताना व्हावे दिशा निर्देशांचे पालन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या 'लॉकडाऊन' दरम्यान गरजू लोकांना अनेक स्वयंसेवी संस्था मदतीचा हात देत आहेत. मात्र, मदत पुरविताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सामाजिक अंतर पाळायला हवे. लॉकडाऊनदरम्यान हातावर पोट असणार्‍यांना अडचणीतून जावे लागत आहे. अनेकांची या या दीर्घ लॉकडाऊन कालावधीत उपासमार होत आहे. अनेक जण आपल्या गावी जात असताना मधेच अडकून पडले आहेत.
दिव्यांग, ज्येष्ठ लोकांचेही या कालावधीत हाल होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. येत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, समाजसेवक अशा गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. रस्त्यांवर असणार्‍या लोकांनाही अन्न पुरविले जात आहे. मात्र, हे करताना काही ठिकाणी मदत घेण्यासाठी अनेक लोक एकत्र येत आहेत. यामुळे कोरोनाचे समूह  संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागणार आहे.  लॉकडाऊनच्या उद्देशालाच हरताळ फासला जाऊ नये,याची काळजी घ्यायला हवी. समाजकार्य करायलाच हवे. मात्र, कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठी शासनाने दिलेले दिशार्निदेश पाळायलाच हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा