केवळ दोन वेळचे अन्न व राहण्यासाठी छत देणे म्हणजे बालहक्काचे संरक्षण नव्हे. त्यांना अन्न, वस्त्र व निवारा याचसोबत मानसिक आधार व समुपदेशनासोबतच मूल्यवर्धित व विकासात्मक शिक्षणाची गरज आहे. बालगृह, सुधारगृहातून ते बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या राहण्याची व उच्चशिक्षणाची जवाबदारी सरकारची आहे. अशा मुलांना कमीतकमी पाच वर्षे त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्यांना जीवनात स्थैर्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी अशा मुलांना नोकरीत आर्थिक निकषावर आरक्षणाची गरज आहे. जेणेकरून भविष्यात अशा बालगृहातून किंवा सुधारगृहातून बाहेर पडल्यावर एक आदर्श नागरिक म्हणून त्यांना जगता येईल. या सगळ्या गोष्टी कागदावर न राहता, त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी योजनांची व कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणेची महत्त्वाची भुमिका आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत
शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८
भीक मागणारी मुले आणि कायदा

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा