सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

सणांमुळे सामाजिक ऐक्य


सुख, समाधान, शांतता आणि आनंदाची पर्वणी म्हणून सण साजरे केले जातात. सणांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि बांधीलकीही जपली जाते. त्यामुळे सणांचा आनंद मनमुराद घ्यायला हवा. सणांची निर्मिती होण्यामागे पूर्वीपासून काही शास्त्रोक्त कारणं आहेत. शीख धर्मियांत गुरुपुरव, बैसाखी, होला महल्ला, दरबारे खालसा या सणांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक धर्मातील सणांद्वारे धर्मनिरपेक्षतेचा आणि संतांच्या सेवेचा संदेश दिला आहे. ख्रिश्चन धर्मात प्रामुख्याने ईस्टर हा सण साजरा करतात. प्रभू येशच्या जन्माचे स्मरण म्हणून ख्रिसमस साजरा होतो.
ईश्वरावर आणि मानवावर प्रेम करणे हा सणांचा प्रमुख उद्देश आहे. सणांद्वारे विविध धर्माची संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविता येते. रोजे ठेवल्यामुळे मनुष्याला भूकेची आणि ईश्वराची जाणीव होते. ईद साजरी करतानाभुकेल्याला अन्न द्यावे, हेच सांगितले जाते. प्रत्येक सणाचे काहीना काही वैशिष्ट्य असून, एकोप्याने सण साजरे करण्यातून मानवता धर्मही जपला जातो.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली)  7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा