बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

‘रासायनिक खतांना महा सोनखत हाच पर्याय’

रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत तर खराब होतोचशिवाय मानवी आरोग्यावरदेखील  विपरीत परिणाम होतोसोनखताच्या वापरामुळे जमिनीसह मानवाच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाहीरासायनिक खतांच्या बरोबरीने सोनखतामुळे उत्पन्न मिळू शकतेत्यामुळे महा सोनखत हे रासायनिक खतांना उत्तम पर्याय असून शेतकर्यांनी याचाच वापर करण्याचा संकल्प सोडायला हवापंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान देशभरात लोकचळवळीत परावर्तीत केले आहेमहा सोनखत प्रकल्प स्वच्छ भारत अभियानाचे पुढचे पाऊल असून या माध्यमातून महिला बचत गटांसह अनेकांना चांगली रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहेदेशभरात सुरू असणार्या स्वच्छ भारत अभियानामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्पप्नांची पूर्तता होत आहेरासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीसह मनुष्याच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेतयामुळे जमिनी नापिक होत असून मानवाला विविध दुर्धर आजारांचा सामना करावा लागत आहेरासायनिक खतांना सोनखत हा चांगला पर्याय आहेमहिला बचत गटांच्या माध्यमातून सोनखत प्रकल्प राबवण्यात यावाशिवाय यासाठी बचत गटांना काही सवलती द्याव्यातयामुळे बचत गट पुढे येतीलमहा सोनखत प्रकल्पाचा सामान्य शेतकर्यांना फायदा होणार आहे
शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीणआदिवासी महिलांना काम मिळणार आहेकाही जिल्ह्यात हा प्रकल्प बचत गटांकडून यशस्वीरित्या राबवला जात आहेराज्यात सर्वत्र हा उपक्रम राबवला जायला हवा आहेहा उपक्रम स्तुत्य आहेयाचे अनुकरण शेतकर्यांनीमहिला बचत गटांनी करायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा