सोमवार, २० एप्रिल, २०२०

भारतात दारिद्र्य आणखी वाढणार

कोरोना संसर्ग गेल्या महिन्याभरात कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. ही बाब मोठी चिंताजनक आहे.या महामारीचा सर्वात मोठा फटका का  दारिद्रयाशी झगडणाऱ्या आपल्या भारताला बसणार आहे . आधीच एका आकडेवारीनुसार भारतामध्ये ८५ कोटी २० लाख लोक दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहेत . कोरोना महामारीमुळे यात आणखी १० कोटी ४० लाख लोकांची भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे . यामुळे गरिबांची संख्या आणखी ८ टक्क्यांनी वाढून तब्बल ९१ कोटी ५० लाख होणार आहे.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

निराशेतून बाहेर या

निराशा ही एक भावावस्था आहे, मात्र ती बराच काळ रेंगाळते तेव्हा आजारात परावर्तीत होते. दुखद बाब म्हणजे अलिकडे देशात नैराश्यग्रस्तांच्या संख्येत वाढ नोंदविली जात आहे. नैराश्यामुळे अपंगत्त्व येणार्‍या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. २0२0 पर्यंत नैराश्य हे अपंगत्त्व येण्याचं दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.  नैराश्य हा गंभीर मानसिक विकार आहे. पण याकडे निर्मळतेनं पाहिलं जात नाही. त्यावर योग्य उपचार घेतले जात नाहीत. नैराश्याची लक्षणं व्यक्तीसापेक्ष बदलत जातात.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

कामगार मंडळाकडील ९५00 कोटी थेट मजुरांच्या खात्यात वळते करा

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी व राज्यातील जनसामान्यांचे जीवन वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्या तातडीने योजनांची अंमलबजावणी केली, ती कौतुकास्पद आहे. परंतु जेव्हापासून राज्यासह संपूर्ण देशात 'लॉकडाऊन'करण्यात आले तेव्हापासून बांधकाम व इतर असंघटित मजुरांचे खूप हाल होत आहेत. बांधकामे व अन्य सर्व कामे थांबली आहेत. या क्षेत्रातील हे बहुतांश मजूर रोजंदारीवर काम करणारे असतात. मोठय़ा प्रमाणात त्यांची रोजी बुडाली आहे.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

बँकिंग क्षेत्रावर विपरीत परिणाम

 कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. दळणवळण व्यवस्थाही थांबली आहे.  या संचार बंदीने शेतीचेही कंबरडे मोडले आहे. द्राक्षे, ऊससारखी बागायती पिके अजूनही शेतातच आहेत. भाजीपाला रस्त्यावर टाकावा लागत आहे.  कामगार, मजुरांची उपासमार होत आहे.त्यांच्या हाताला काम नाही. हातावर पोट असलेल्या लोकांना मदतीची गरज आहे.

समाजकार्य करताना व्हावे दिशा निर्देशांचे पालन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या 'लॉकडाऊन' दरम्यान गरजू लोकांना अनेक स्वयंसेवी संस्था मदतीचा हात देत आहेत. मात्र, मदत पुरविताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सामाजिक अंतर पाळायला हवे. लॉकडाऊनदरम्यान हातावर पोट असणार्‍यांना अडचणीतून जावे लागत आहे. अनेकांची या या दीर्घ लॉकडाऊन कालावधीत उपासमार होत आहे. अनेक जण आपल्या गावी जात असताना मधेच अडकून पडले आहेत.

बेरोजगारी वाढू नये,याची खबरदारी घ्या

कोरोना विषाणूमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे गंभीर परिणाम होतील. भारताचा २0२0 मध्ये विकासदर ५.३ टक्के राहणार आहे.पण आता भारताचा विकासदर तीन टक्क्य़ाहून कमीच राहील. याचा अर्थ असा आहे की, या २0२0-२१ या वर्षात भारताला अंदाजे पाच लाख कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. तीन आठवड्यांचे लॉकडाऊन आणखी नुकसान होऊ शकते. काही महिन्यांसाठी अर्थव्यवस्था खिळखिळी राहिली किंवा सातत्याने विकासदरात घसरण होत असेल तर त्याला मंदी म्हणतात. हीच स्थिती जर बराच काळ टिकली आणि विकासदर नकारात्मकच झाला तर त्याला महामंदी म्हणतात. भविष्यात आपल्याला महामंदीची झळ बसू नये, म्हणून केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.