शनिवार, १८ जानेवारी, २०२०

वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ निर्माण व्हावी

निसर्ग आपल्याला नेहमी भरभरून  देत असतो. त्यात तो कसलीच कुचराई करत नाही. त्यामुळे आपण जीवन सुसह्यपणे चालले आहे. पण आपण आपला विकास साधत असताना या निसर्गावरच घाला घालत आहे. आपल्या पापामुळे वायू,ध्वनी,जल प्रदूषण भयानक वाढले आहे. याचा फटका शेवटी आपल्यालाच बसत आहे. म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. आपल्याला वेळीच सावध व्हायला हवे आहे. वाढत्या आधुनिकीकरण व पाणी प्रदूषण व अन्य कारणांमुळे निसर्गाचा जो समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. त्याला पुन्हा वाटेवर आणण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे  बेसुमार जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे.

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

तानाजी चित्रपट टॅक्स फ्री करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशात 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही  हा चित्रपट टॅक्स फ्री करायला हवा. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 'तान्हाजी' चित्रपट हा त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने त्यांची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत अभिनेता अजय देवगण यानेसुद्धा 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी विनंती सरकारला केली होती. 

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

दिल्ली कुणाची?

सुधारित नागरिकत्व कायदा, 'एनआरसी' या विषयावरून देशभरात आंदोलने सुरू आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेला हॉल हे ताजे प्रकरण असतानाच दिल्लीची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. मोदी सरकारने देशाची सुरक्षितता, ऐक्य आणि काश्मीर आदी प्रश्न पुढे केले आहेत,मग ती निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची. दिल्ली विधानसभा निवडणूकसुद्धा मोदी सरकार याच मुद्द्यावरून लढवणार आहे,यात शंका नाही,कारण त्यांच्याकडे दुसरे प्रश्नच नाहीत. विकासदराच्या गटांगळ्या, वाढती महागाई, बेरोजगारी अशा ज्वलंत प्रश्नांमुळे देशात अस्वस्थता आहे. याकडील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकार वेगळेच मुद्दे समोर आणत आहे.

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

यशस्वी होण्याचे नऊ मंत्र

प्रत्येक माणसात प्रतिभेचा राजहंस दडलेला असतो, माणसाने या राजहंसाचा शोध घेतला पाहिजे, तसेच उच्च ध्येय ठेवून कर्तृत्वाने उंच शिखर गाठावे. विकासाच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. गरिबांनी गरीबच रहावे म्हणून समाजात अनेक गोष्टी पेरल्या आहेत. यात अंथरुण पाहून पाय पसरावेत, साधी राहणी, उच्च विचार अशा गोष्टींचा समावेश आहे, परंतु अंथरूण पाहून पाय पसरायला लागतात, तर उद्या दुसरा कुणी तुमच्या अंथरुणात पाय घालेल. त्यामुळे तुम्ही तुमचे अंथरूण वाढवा. साधी राहणी व उच्च विचार हाही बकवास आहे. कुणी पॉश राहतो म्हणून त्याचे विचार वाईट आहेत, असे मानण्याचे कारण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एके ठिकाणी म्हटले आहे की, 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या उदासिन वृत्तीचा त्याग करण्यास लोकांना प्रवृत्त केले पाहिजे.

लोकसंख्येवर नियंत्रण आणा

1 जानेवारी 2020 या दिवशी आपल्या भारतात 67 हजार 385 मुलांनी जन्म घेतला. ज्या घरात बाळ जन्माला आले,त्या घरात आनंद,उत्साह ओसंडला असेल यात शंकाच नाही. पण देशाचा विचार केला तर मात्र मोठा काळजीचा प्रश्न आहे. ही संख्या सरासरी धरली तर आपल्या देशात वर्षाला 2 कोटी 45 लाख बाळे जन्माला येतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्ये इतकी आहे. एका वर्षाला अडीच कोटी मुलांचा जन्म ही काही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब नाही. उलट या नव्याने जन्माला आलेल्या मुलांसाठीच्या संसाधनांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आधीच आपल्या देशात संसाधने,अन्न यांची मोठी कमतरता आहे.

बुधवार, १ जानेवारी, २०२०

ज्येष्ठ राजकारण्यांनाही रिटायर्ड करा


आपला देश तरुणांचा देश आहे. 2021 च्या जणगणनेनुसार देशातील तरुणांची संख्या 51 टक्के होईल, असे सांगितले जाते. 2011च्या जणगणनेनुसार तरुणांची संख्या 34 टक्के होती. इतर देशांच्या तुलनेत आपला देश सर्वाधिक तरुण आहे. चीनमध्ये 21 कोटी तर अमेरिकेत 7 कोटी तरुण आहेत. असे असतानाही आपल्या देशाची सूत्रे ही म्हातार्या राजकारण्यांच्या हातात आहेत. आपल्या देशात 50 ते 60 वयातल्या वृद्धांना तरुण म्हटले जाते. मग म्हातारे कुणाला म्हणायचे हा प्रश्नच आहे. सरकारी नोकरमान्यांना 58 ते 60 वय झाल्यावर सेवानिवृत्त केले जाते. का तर ते काम करण्यास लायक नसतात म्हणून. राजकारणात मात्र वृद्ध मंडळी खुर्चीला चिटकून असतात.या मंडळींना मात्र कसलेच बंधन नाही. खरे तर यांनाही रिटायर्ड करायला हवे. तरुणांच्या हातात सत्तेची, राजकारणाची सूत्रे द्यायला हवीत. ज्यांची संख्या मोठी आहे, त्यांना राजकारणात प्राधान्य द्यायला हवे.ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत, त्या वृद्ध राजकारण्यांना सत्तेची लालसा सुटतच नाही.

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पुढे या


लाचलुचपत मागणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी त्यांची तक्रार होणे अति आवश्यक असते. लाचलुचपत विभागाला तक्रार प्राप्त झाल्याशिवाय अशा लोकांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळेच असे लोक बेमालूमपणे लोकांकडून लाच घेऊन त्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करतात. अशा भ्रष्ट लोकांना धडा शिकविण्यासाठी लोकांनी पुढे येऊन या भ्रष्टाचाराची तक्रार करणे गरजेचे आहे. तक्रार आल्यावरच संबंधित प्रकरणात कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे लोकांनी पुढे यावे. महसूल आणि 'रोहयो'चा विभाग भ्रष्टाचारात नेहमी पहिले स्थान असतो. 2018 मध्येही लाचखोरीमध्ये महसूल विभाग दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रथम स्थानी होता.  महसूल विभागातील भ्रष्टाचाराची २०१ प्रकरणे उघडकीस आली असून २५३ जणांना अटक करण्यात आली आहे. या विभागात सरकारच्या अनेक योजना असून या योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी लोकसेवकांकडून लाच घेतली जाते.