बुधवार, १५ जानेवारी, २०२०

तानाजी चित्रपट टॅक्स फ्री करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशात 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही  हा चित्रपट टॅक्स फ्री करायला हवा. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 'तान्हाजी' चित्रपट हा त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने त्यांची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत अभिनेता अजय देवगण यानेसुद्धा 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी विनंती सरकारला केली होती. 
तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे सुभेदार असून त्यांची १६७0 मधील सिंहगडावर केलेल्या कामगिरीचा आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवला जातो. त्यामुळेच हा चित्रपट टॅक्स फ्री असावा. 'तान्हाजी' सिनेमाची कथेसह त्यांची स्टार कास्टसुद्धा तितकीच तगडी आहे. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान या तिन्ही कलाकारांनी अगदी उत्तम काम केले असल्याचे समीक्षकांचे तसेच प्रेक्षकांचे मत आहे. तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. सिनेमामध्ये १७ व्या शतकात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोंढणा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांचा हा पराक्रम सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रसिकांसमोर मांडण्यात आला आहे. हा सिनेमा ३ डी माध्यमातूनही रिलीज करण्यात आला आहे. शाळकरी मुलांसह युवकांना तानाजी मालुसरे यांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय होणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा