मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

खेळण्यासाठी मैदाने विकसित करा

मुले खेळायचे विसरून गेली आहेत. शहरातील मुले शाळा, विविध प्रकारचे क्लासेस यातच गुरफटून गेली आहेत आणि राहिलेला वेळ मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यातच घालवत असल्याने ही मुले खेळापासून दूर गेली आहेत. ग्रामीण भागातही कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांना खेळायला बाहेर काढणे आवश्यक आहे,यासाठी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन यांनी संयुक्त रित्या मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
मुलांचे आरोग्य चांगले असेल तरच भारताची भावी पिढी सुदृढ बनणार आहे, नाहीतर देशाला फार मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागणार आहे. शाळा स्तरावर खेळाला अनिवार्य विषय म्हणून मान्यता मिळायला हवी आहे आणि गाव आणि शहरात मैदाने विकसित केली जायला हवी आहेत. अनेक शहरांमध्ये  उद्याने विकसित केली जात आहेत. मात्र लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने मुले घराबाहेर पडत नाही. मोबाईलच्या विश्‍वातून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना हक्काची खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यादृष्टीने विचार करून मुलांना खेळण्यासाठी मैदाने विकसित करण्याबाबत कार्यवाही व्हायला हवी आहे.अनेक शहरातील अनेक उद्याने विकसित केली जात आहेत. उद्यानांमध्ये ज्येष्ठांसाठी वॉकींग ट्रॅक तयार केले जाते. मात्र, लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे मैदानांचा विकास होणे आवश्यक आहे. अनेक शहरांमध्ये  अनेक ठिकाणी जुने मैदान, उद्यानांच्या जागा आहेत या ठिकाणी मैदाने विकसित करण्याची गरज आहे. मुले सुदृढ असतील तरच देश सुदृढ राहणार आहे. सध्या लहान वयातच मुलांना लठ्ठपणा, मानसिक रोग, मधुमेह, हृदय रोग, दमा, कर्करोग सारखे आजार जडू लागले आहेत. शरीराच्या हालचाली होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना मैदाने विकसित करण्यासाठी आदेश द्यायला हवेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा