वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरताना मापात पाप कसे होते, त्याची जाहिरात प्रत्येक पेट्रोल पंपावर करण्याचा निर्णय वैधमापनशास्त्र विभागाने
दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.
हा निर्णय वाहनधारकांच्या हिताचा आहे.यातून त्यांची
होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे. मात्र भेसळ समजण्यासाठीचीही यंत्रणा पेट्रोल पंपांवर
बसवणे आवश्यक आहे. ग्राहक जेवढे पैसे मोजतात, तेवढे पेट्रोल किंवा डिझेल वाहनधारकांच्या पदरात पडत नाही. याबाबतच्या तक्रारीचा मोठा भेंडोळा वैधमापनशास्त्र विभागाकडे सातत्याने पडत
असतो. त्यानुसार काही ठिकाणी पेट्रोल पंपांच्या तपासणी होतात,
पण तरीही काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल कमी मिळत असल्याच्या
तक्रारी होतच असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल
कमी का मिळते, यामागील ग्राहकांना कळावीत यासाठी प्रत्येक पेट्रोल
पंपावर जाहिरात लावण्याचा निर्णय घेतला गेला होता. या निर्णयाचे
स्वागत होईल, मात्र त्याची अंलबजावणी करायला हवी.
बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९
तंत्रज्ञानाचा अतिरेक घातकच
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर
झाले आहे. त्यामुळे
मानव उपयोगी नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी वैज्ञानिक झटत आहेत. मात्र दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे होणार्या दुष्परिणामावर नियंत्रण
मिळविण्यासाठी समानांतर संशोधन करावे लागत आहे. कुठल्याही गोष्टीचा
अतिरेक हा घातकच ठरतो, तसेच तंत्रज्ञान वापराचेही होत आहे.
त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना संवेदनशीलता बाळगण्याची वेळ आता
आली आहे. गेल्या काही दशकापासून तंत्रज्ञानाचा कल्याणकारी उपयोग
मागे पडत असून, दुष्परिणाम वाढले आहेत. काही विघातक मनोवृत्तीतून मानवसृष्टीला नष्ट करणारी अणुहत्यारे निर्माण केली
जात आहेत.
सुक्ष्म सिंचन पद्धतीबाबत जागृती हवी
गेल्या
पंधरवड्यातील राज्यातल्या घटना पाहा. 16 जिल्ह्यातल्या शहरांना
आणि नदी परिसरातील गावांना महापुराचा फटका बसला. सुुमारे बारा
हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ( बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस
नाही.) आपल्याकडे पाऊस नियमित नाही. 2005 मध्ये असाच मोठा पुराचा फटका बसला होता. त्यानंतर सर्वात
मोठा फटका बसला आहे. असे असले तरी आपल्याकडे नद्या या पावसाळ्यातच
दुथडी भरून वाहतात.मात्र उन्हाळ्यात त्यातील बहुतांश नद्या कोरड्या
पडतात. त्यामुळे पाण्याचे नियोजन ही आवश्यक गोष्ट झाली आहे.
अनेक ठिकाणी नियोजनाअभावीच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
शाळांच्या वीजबिलाचा प्रश्न सोडवा
वीज वितरण
कंपनीने जिल्हा परिषदांच्या शाळांना व्यावसायिक बिलाची आकारणी करून आता सात आठ वर्षे
झाली आहेत. या पद्धतीच्या आकारणीमुळे या शाळांना सातशे ते आठशे
वीज बील दर महिन्याला येत आहे. या बिलाची तरतूद कोणत्या योजनेतून
करावी असा प्रश्न आहे. शिवाय यासाठी खास
निधी येत नाही. साहजिकच याचा आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडत
आहे. एकिकडे जिल्हा परिषदांच्या बहुतांश शाळांमध्ये संगणक,
ई-लर्निंगचा वापर होत आहेत. लोकवर्गणी, जिल्हा परिषद निधी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या
माध्यमातून ई-लर्निंग सुविधा उपलब्ध होत आहेत.यासाठी विजेची नितांत आवश्यकता आहे.
सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया व्हावी
पाणी हा
परमेश्वराचा प्रसाद आहे, त्याचा अमर्याद
वापर झाला तर त्याचा एक दिवस हिशोब चुकता करावा लागेल. यामुळे
शेतकर्यांनी आणि लोकांनी घरगुती वापराच्या पाण्याचा वापर काटकसरीने
करायला हवा, असे प्रतिपादन अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या
भाषणात वारंवार सांगत असतात. मोदी यांनी मागे गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा
निर्णय घेतल्यावर देशातील अन्य नद्यांच्या शुद्धीकरण करावे, अशी
मागणी जोर धरली आहे. पृथ्वीतलावर 71 टक्के
पाणी असले तरी सगळ्याच पाण्याचा वापर करता येत नाही.त्यामुळे
सध्या सगळीकडे सांडपाण्याचा पसारा वाढला आहे. हेच पाणि वाहत्या
नदींमध्ये मिसळत आहे. लोक आजाराला बळी पडत आहेत. परदेशात सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून त्याचा अन्य कामांसाठी वापर
केला जात आहे.
एटीएम कार्ड वापरण्याचे प्रशिक्षण द्या
एटीएम कार्डची मुदत संपली
आहे. क्रेडिट कार्डची
पत वाढविण्यात येत असल्याचे फोनवरून सांगून भामटे स्वत: बँकेचा
अधिकारी असल्याचे बतावणी करतात. बर्याचदा
ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा एटीएम कार्डवरील नंबर वाचून
सांगा अथवा कार्ड बंद होईल, असे सांगतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून नागरिक एटीएम कार्ड,
डेबिट कार्डवरील नंबर सांगून मोकळे होतात. सायबर
गुन्हेगार त्या क्रमांकाच्या आधारे दुसरे एटीएम कार्ड तयार करतात अथवा त्या नंबरच्या
आधारे ऑनलाईन खरेदी करून लाखो रुपयांना चुना लावतात. इंटरनेट, संगणक
आणि मोबाईलच्या वापरासोबत या साधनांचा वापर करून गुन्हे करणार्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषत:
एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा
क्रमांक आणि पासवर्ड मिळवून ऑनलाईन गंडविण्याच्या घटना वाढल्या आहेत. हे लोण आता ग्रामीण भागातही पोहचले आहे.
मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९
अमिताभ आणि यकृताबाबत गैरसमज
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतेच आपले यकृत 75 टक्के निकामी झाले असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, आणि हे सांगताना त्यांनी आपण अगदी ठणठणीत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मला टीबी आणि हेपेटायटीस-बी झाल्याचे सांगताना वाईट किंवा अपमानास्पद वाटत नाही, असेही स्पष्ट केले आहे. टीबीबद्दल जागरूकता संदेश देताना ते स्वतःचे आपले उदाहरण देत असतात.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)