बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

गाय खरेदी करताना...


शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर आहे. त्यामुळे गाय खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. गाय खरेदी करताना त्याची जात व दुधाचा निकष घ्यायला हवा. दुधाचे सर्वाधिक उत्पादन पहिल्या पाच वेतांत मिळते. त्यामुळे पहिल्या किंवा दुसर्या वेताची गाय खरेदी करावी. याशिवाय दुभत्या जनावरांचे संगोपन व्यवस्थित व्हायला हवे. त्यासाठी चारा व खुराकाचा योग्य समन्वय हवा. जनावराच्या वजनाच्या दोन ते तीन टक्के कोरडा चारा त्यांना द्यावा. मका, गवत व कडबा यांची कुटी करुन चारा द्यावा. हिरव्या चार्याचे प्रमाण अधिक असायला हवे. जनावरांना दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे. गोठा हवेशीर व स्वच्छ ठेवावा.
गाय व्यायल्यानंतर अ नेकजण तिचे दूध आणि चीक गाईलाच पाजतात. का प्रकार गायीच्या आरोग्याला धोकादायक आहे. चीक वासरांना पाजावा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा