बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

अवयवदानाबाबत जनजागृती व्हायला हवी


रक्तदानाबरोबरच अवयवदानही महत्त्वाचे आहे. आपल्या देशात एकूण लोकसंख्येपैकी फक्त 0.08 टक्का अवयव दान होते. हेच प्रमाण पाश्चात्य देशांमध्ये 10 ते 20 टक्क्यांपर्यंत आहे. दिल्ले येथील ऑल इंडिया मेडिकल सायन्स (एम्स) रुग्णालयात 3 ऑगस्ट 1994 रोजी देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण झाले. तेव्हापासून आधुनिक वैद्यकशास्त्राने हृदय प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी करण्याचा ध्यास घेतला. चेन्नई येथे 1995 मध्ये दुसरा हृदय प्रत्यारोपणाचा प्रयत्न झाला. त्यामुळे भारतातदेखील हृदय प्रत्यारोपणासाठी अत्यावश्यक पायाभूत सुविधा, कुशल शल्यचिकित्सक उपलब्ध असल्याचे जगाने मान्य केले. आतापर्यंत 21 हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रकिया झाल्या आहेत. मागणीपेक्षा पुरवठा फारच कमी आहे. त्यामुळे हृदय शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण प्रतिक्षेत आहेत.
आजच्या घडीला देशातील तरुण लोकसंख्येच्या 1 टक्का रुग्णांना हृदयाचे वेगवेगळे विकार आहेत. यातील बहुंताश रुग्णांवर हृदय प्रत्यारोपण हाच पर्याय आहे. हीच परिस्थिती किडनीबाबत आहे. डोळे व इतर अवयवांबाबत समाधानाची परिस्थिती नाही. त्यामुळे अवयव दानाबाबत लोकांमध्ये जागृती महत्त्वाची आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा