शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

दीर्घायुष्यासाठी चालत राहा!


सकाळी झोपेतून उठल्यानंतर दररोज ३५ मिनीटे चालणे गरजेचे आहे. ऋतू हा कोणताही असो. त्यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. चालण्याच्या व्यायामुळे आजारी पडण्याचे प्रमाण हे खूप कमी असते. ह्दयाचा आजार असलेल्या रुग्णांना तर दररोज शक्य होईल, तेवढे चालावे. त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढू शकते. सकाळच्या गार हवेत फिरल्याने तणावही दूर होतो. गर्भवती महिलांचाही रक्तप्रवाह यामुळे चांगला राहतो. अशा सर्वच बाबींवर चालणे हा उपाय आहे. चालण्याअगोदर हे लक्षात घ्या .
डांबर रस्त्यावर चालण्याऐवजी सपाट जमीन, मैदान किंवा बागेत चालावे. प्रारंभी हळू चालावे, त्यानंतर वेग वाढवावा, १५ मिनिटे भरभर चालून पुन्हा चालण्याचा वेग कमी करावा, परत हळूहळू वेग वाढवावा. यामुळे पाय, गुडघे आणि हृदय यांच्यावर ताण कमी येतो. चालतांना पायात बुट किंवा चप्पल घालावी. गुडघे, हाडे किंवा सांधे प्रचंड दुखत असतील तर चालू नका. चालण्याच्या व्यायामामुळे एकही पैसा खर्च होत नाही. कुणालाही करता येईल, असा हा प्रकार आहे. याला कुठल्याही साहित्याची गरज नाही. शरीर तंदुरुस्त व चपळ ठेवण्यासाठी चालण्याचा लाभ होतो. सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजन शरीराला मिळतो. हाडांकरिता आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या उन्हातून मिळतात. एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. सतत काम करुन येणारा थकवाही यामुळे दूर होतो. तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत. रात्री झोपही चांगली लागते. मनाची एकाग्रता व चिंतनासाठी फायदेशीर वजन कमी करण्याचा किंवा संतुलित ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो. पचनक्रिया सुधारुन, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात. हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्‍वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात. मोतीबिंदूची शक्यता कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. दररोज झोपेतून उठल्यानंतर सकाळच्या गार हवेत नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. तसेच व्यायामातील हा सर्वोत्तम प्रकार असून, त्याकरिता कुठल्याही साधनाची गरज नाही. ताण तणावापासून मुक्तता तर मिळतेच शिवाय दिवसभर ताजेतवाने वाटते. लहान मुलांपासून ते वृद्धांपयर्ंत कुणीही हा व्यायाम सहजपणे करू शकतो. त्यामुळे विविध आजारावरही नियंत्रण ठेवता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा