बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

सुक्ष्म सिंचन पद्धतीबाबत जागृती हवी


 गेल्या पंधरवड्यातील राज्यातल्या घटना पाहा. 16 जिल्ह्यातल्या शहरांना आणि नदी परिसरातील गावांना महापुराचा फटका बसला. सुुमारे बारा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ( बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही.) आपल्याकडे पाऊस नियमित नाही. 2005 मध्ये असाच मोठा पुराचा फटका बसला होता. त्यानंतर सर्वात मोठा फटका बसला आहे. असे असले तरी आपल्याकडे नद्या या पावसाळ्यातच दुथडी भरून वाहतात.मात्र उन्हाळ्यात त्यातील बहुतांश नद्या कोरड्या पडतात. त्यामुळे पाण्याचे नियोजन ही आवश्यक गोष्ट झाली आहे. अनेक ठिकाणी नियोजनाअभावीच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
अनेकदा किरकोळ गोष्टीसाठीसुद्धा पाणी वाया घालविले जाते. सध्या पाणी हा विषय मोठा गंभीर आणि महत्त्वाचा विषय बनत चालला आहे. पावसाच्या पाण्याची साठवण,त्याचा काटकसरीने वापर या गोष्टी समाजाला पटवून देण्याची गरज आहे. त्यात जलसाक्षरतेबाबत चावडी व शाळा-महाविद्यालयांमधून प्रचार होणे गरजेचे आहे. सूक्ष्म जलसिंचनाचे वेगवेगळे प्रयोग राबवण्याची गरज आहे. त्यात ठीबक, सुक्ष्म ठीबक, तुषार आदींबाबत शेतकर्यांमध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे. पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठविले पाहिजे. तसेच ते जमिनीत मुरविण्याची गरज आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. याशिवाय सांडपाण्याचा पुर्नवापरदेखील केला पाहिजे. पिकांना जेवढ्या पाण्याची गरज आहे, तेवढेच पाणी दिले पाहिजे. नाही तर अनेकदा ऊसाला रात्रभर कूपनलिकेचे किंवा कालव्याचे पानी सोडून दिलेले असते, असे चित्र पाहावयास मिळते.या गोष्टी टाळ्ल्या पाहिजेत. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा