शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

वाचन संस्कृती लोप पावली


'वाचालं तर वाचाल', हे बिद्र वाक्य सर्वच वाचतात. वाचल्याने सभोवतालच्या जगाचे ज्ञान मिळते. आपण कुठे आहोत, जग कुठे चालले, त्याचे भान येते. मात्र अलीकडे वाचन संस्कृतीच हद्दपार होत आहे.  सध्या विज्ञानाचे युग अवतरले आहे. जागतिक क्रांती झाली आहे. जग पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले आहे. विज्ञानाने प्रचंड शोध लावले आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रत अनेक शोध लागले आहे. त्यामुळे युवा पिढी माहिती व तंत्रज्ञानाचा मायाजाळात गुरफटत आहे. परिणामी कुणालाच आता वाचनासाठी सवड मिळेनासी झाली आहे. सध्या कुणालाही वाचनासाठी वेळ मिळत नाही. जास्तीत जास्त युवक फेसबुक व व्हॉट्सअँपवरील मॅसेजेस, फनी व्हिडिओ पाहण्यात धन्यता मानत आहे. 

गावागावात आता वाचनालये सुरू झाली आहे. त्यासाठी शासन अनुदान देत आहे. मात्र त्याकडे गावातील युवक ढुंकूनही बघत नाहीत. केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणारेच विद्यार्थी या वाचनालयांचा लाभ घेताना दिसतात. विद्यार्थी कसेतरी शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमांची पुस्तके वाचतात. त्यापलिकडे इतर ग्रंथ, कथा, कादंबर्‍या, कविता वाचन करताना कुणीच आढळत नाही. शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचनालय असताना विद्यार्थी तेथून केवळ अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचीच उचल करतात.
सोशल साईटवरून माहिती मिळविण्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. तरीही मोजकेच काही जण वाचण्यासाठी धडपड करताना दिसतात, तेव्हा वाचन संस्कृतीची आठवण होते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा