शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

कौन कितना पानी मैं...


 काश्मीरमधील कलम ३७0 हटवल्यानंतर पाकिस्तान वारंवार भारताला युध्दाच्या धमक्या देत आहे. भारताबरोबर अनेक औद्योगिक व्यापार संबंध देखील पाकिस्तानने रद्द केले. मात्र पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती बघता पाकिस्तान खरंच युद्घ करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे का असा सवाल उपस्थित होतो.  जागतिक बँकेनुसार, २0१८ पर्यंत पाकि स्तानची जीडीपी २५४ अब्ज डॉलर होती तर भारताची जीडीपी २.८४ ट्रिलियन होती. म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था ही पाकिस्तानच्या ११ पटीने अधिक आहे.
भारताचा आर्थिक वृध्दी दर हा सात टक्के जरी राहिला तरीही अर्थव्यवस्थेमध्ये २00 अब्ज डॉलर जोडले जातील जे पाकिस्तानच्या २0१८ च्या जीडीपीच्या ८0 टक्के एवढे आहे.
पाकिस्तानचा आर्थिक वृध्दी दर हा ४.३ टक्क्यांनी वाढत आहे. आयएमएफनुसार, २0१९-२0 मध्ये पाकिस्तानचा वृध्दी दर हा तीन टक्क्यांवर येईल. मे २0१९ मध्ये पाकिस्तानमधील महागाईचा दर हा नऊ टक्क्यांवर पोहचला होता. येणार्‍या काळात देखील पाकिस्तानमध्ये महागाई मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात देखील मोठय़ा प्रमाणात तूट आहे. पाकिस्तानचे सरकार महसूल उत्पादन भरून काढण्यासाठी वारंवार कर्ज घेत आहे.
पाकिस्तानच्या रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत १५७ वर पोहचली आहे.
मार्च २0१९ मध्ये पाकिस्तानवर सहा लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. चीन ते सौदी अरब सर्वांकडून पाकिस्तानने कर्ज घेतले आहे. अलीकडेच आयएमएफने म्हटले होते की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था गंभीर आहे. खराब आर्थिक धोरणे, अर्थसंकल्पातील तूट, ओवरवॅल्यू एक्सचेंज रेट, कर्ज यामुळे पाकिस्तान अशा परिस्थितीत अडकला आहे. असे असताना उसने अवसान आणून पाकिस्तान भारताला धमकी देत आहे. ही धमकी जगात आपली लाज राखण्यासाठी दिली जात आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा