बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया व्हावी


पाणी हा परमेश्वराचा प्रसाद आहे, त्याचा अमर्याद वापर झाला तर त्याचा एक दिवस हिशोब चुकता करावा लागेल. यामुळे शेतकर्यांनी आणि लोकांनी घरगुती वापराच्या पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा, असे प्रतिपादन अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात वारंवार सांगत असतात. मोदी यांनी मागे गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा निर्णय घेतल्यावर देशातील अन्य नद्यांच्या शुद्धीकरण करावे, अशी मागणी जोर धरली आहे. पृथ्वीतलावर 71 टक्के पाणी असले तरी सगळ्याच पाण्याचा वापर करता येत नाही.त्यामुळे सध्या सगळीकडे सांडपाण्याचा पसारा वाढला आहे. हेच पाणि वाहत्या नदींमध्ये मिसळत आहे. लोक आजाराला बळी पडत आहेत. परदेशात सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून त्याचा अन्य कामांसाठी वापर केला जात आहे.
आपल्याकडे काही राज्यात प्रकल्प सुरू असले तरी अशा प्रकल्पांची संख्या वाढवण्याची गरज आहे. महापालिका क्षेत्रात तर असे प्रकल्प वाढायलाच हवेत. कारखान्याच्या पाण्याचे आणि सांडपाण्याचे शुद्धीकरण करून वाहत्या प्रवाहात सोडयला हवे. या पाण्याचा वापर करून गायरान, ओसाड माळरानावर झाडे लावता येतील. शहरातील सांडपाण्याचे शुद्धीकरण केल्यावर जवळपासच्या शेतीसाठी त्याचा वापर करता येईल. सरकारतर्फे गवपातळीवर विकासनिधी देताना , जे निकष असतात त्यात सांडपाण्याच्या शुद्धीकरणाचा निकष लावायला हवा. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा