शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

मुलांमध्ये श्वासनासंबंधीचे आजार वाढले

वाढते प्रदूषण, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसून येऊ लागला आहे. विशेषत: श्वसनाशी संबंधित आजार वाढले आहेत. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दरवर्षी चार ते पाच टक्क्याने वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फुसाला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे प्रमाण कमी होतो. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागते. दमा हा आजार अनुवांशिकतेने अथवा वाढते प्रदूषण, दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळे त्रास होऊ शकतो. विशेष म्हणजे श्वासनासंबंधाचे आजार  ग्रामीणपेक्षा शहरात अधिक प्रमाणात आढळून येत आहेत.  कारण भागात प्रदूषणाचे प्रमाण शहरांपेक्षा कमी आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना दम्याचा धोका अधिक आहे. वाढते शहरीकरण, गाड्यांची रहदारी तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
या आजारांना आणखी एक कारण असल्याचे पुढे येत आहे. बदललेली आहारपद्धती हे सुद्धा दमा होण्यास प्रमुख कारणे मानले जाते. पिज्झा, बर्गर, फास्ट फूड, चिप्स, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तसेच वेगवेगळ्या पद्धतीची शीतपेये आदीचे अधिक सेवनही दमा होण्यास कारणीभूत ठरते. दम्याबरोबरच  दरवर्षी क्षयरोगाचे सव्वा लाख रुग्ण आढळून येतात. क्षयरोगात न्युमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूचे दुसरे कारण ठरले आहे. विशेष म्हणजे, ‘मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी’ (एमडीआर) ७० ते ८० हजार नवे रुग्णही दरवर्षी सामोर येत आहे. यात साधारण ८ टक्के लहान मुले असतात. सध्या सगळीकडे  ‘व्हायरल’चा प्रकोप सुरू असलातरी ५० टक्के रुग्ण हे ‘डायरिया’चे आहे. दूषित पाणी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार होतो. या शिवाय, अ‍ॅलर्जी अस्थमा, डेंग्यूचे रुग्णही दिसून येऊ लागले आहेत. साहजिकच सततच्या आजारामुळे कुटुंबाचे बजेटसुद्धा वाढले आहे. श्वासनासंबंधीचे आजार टाळण्यासाठी योगा,प्राणायाम यावर जोर दिला पाहिजे. घराबाहेर पडताना मास्कचा अधिक वापर करायला हवा. तरच हे आजार नियंत्रणात येणार आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा