शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

कृत्रीम पावसाची बनवेगिरी

राज्यात एकिकडे जनता महापुराने त्रासली असताना आणि दुसरीकडे पावसाविना दुष्काळी तहानली असताना राज्य शासन आणि प्रशासन कृत्रीम पावसाची बनवेगिरी करत असल्याचा प्रकार संतापजनक आहे.या शिवाय कृत्रीम पावसासाठीचा 31कोटीचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहेमात्र ही बनवेगिरी राज्यातल्या जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असून याचा जाब जनतेने विचारायला हवाया संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई व्हायला हवीकृत्रीम पावसासाठीचे विमान अद्याप भारतातच दाखल झाले नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे राज्य शासनाकडून कृत्रीम पावसाची तारीख पाळण्यासाठी ही दिखावेगिरी केली जात असल्याची चर्चा आहेमागे 8 ऑगस्टला औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या अधिकार्यांनी कृत्रीम पावसाची तयारी पूर्ण झाली असल्याचे आणि पावसासाठीचे विमान आले असल्याचे सांगितले होतेप्रयोगाला सुरुवात करत असल्याचेही स्पष्ट केले होतेपण प्रत्यक्षात पावसासाठी लागणारे विमान अद्याप सौदी अरेबियातच असल्याचे पुढे आले असल्याने चक्क राज्य शासनच जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहेत्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न आहे.

कृत्रीम पावसासाठी डॉपलर रडार बसवण्यात आले आहेमात्र यासाठी महत्त्वाचे लागणारे सी-90 हे विमान औरंगाबादमध्येच नव्हे तर भारतातच आले नाहीअमेरिकेहून निघाल्यावर हे विमान आता सौदी अरेबियात अडकले आहेइथे विमानातील तांत्रीक त्रुटी दूर केल्या जात आहेतअजून या विमानाला भारतात यायला आठवड्याभराचा अवकाश असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची अद्याप खात्री नाहीप्रशासनाने मात्र सोलापूरला असलेले आयआयटीएमचे विमान मागवल्याचा बनाव केलाविशेष म्हणजे हे विमान औरंगाबादमध्ये दोन दिवस थांबले होतेआणि नंतर ते सोलापूरला परतही गेलेहा चक्क फसवणुकीचा प्रकार असून शासन यातून काय साध्य करणार आहेआगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शासन आपण दुष्काळी जनतेसाठी काम करत असल्याचा कांगावा करत आहेसध्या शासनाला कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर यायचे आहेत्यामुळे शासनाकडून असला जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार होत आहेशासन नोकर भरती उंबरठ्यावर आणली आहे,कर्मचार्यांना सातवा वेतन दिला आहे.मराठ्यांना आरक्षण जाहीर केलेधनगर सुपात आहेजनताप्रिय निर्णय घेण्याचा सपाटा सध्या सुरू आहेमात्र प्रत्यक्षात जनतेच्या हातात काय मिळणारहे पाहावे लागणार आहे.
सध्या राज्यात मुंबई ठाणेकोल्हापूरसांगलीनाशिकसारखी शहरे महापुराने पुरती घायाळ झाली आहेत तर बहुतांश जिल्हे पाऊस नसल्याने तहानली आहेत.फक्त नदीकाठच्या आणि धरण क्षेत्रातल्या शहरांना पुराचा फटका बसला आहेबाकी जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच आहेकृत्रीम पावसाचा निर्णय मुळात घाईघाईत घेतला आणि त्यासाठी फक्त 31 कोटींची तोकडी तरतूद केली.आणि कृत्रीम पावसाचे विमान आले आणि प्रयोगही सुरू झालाअसे सांगून आम्ही दुष्काळी जनतेचे कैवारी आहोतअसे सांगून सहानुभूतीही मिळवण्याचा प्रयत्न केलापण कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाहीयाची प्रचिती आलीआणि बनवेगिरी उघड झाली.-मच्छिंद्र ऐनापुरेनाशिक 7038121012

1 टिप्पणी:

  1. कृत्रिम पावसाचा प्रयोग नाहीच

    पावसाळा सुरू झाल्यानंतर ढग येतात, पण पाऊस पडत नाही, अशावेळी काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडला जातो. हवेतील बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. महाराष्ट्रात २००३, २००४ आणि २००९, २०१० व २०१९ मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले होते. यंदा पावसाने दडी मारल्याने कृत्रिम पावसाची शक्‍यता वर्तविली गेली,पण तसा कोणताही विचार नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.

    उत्तर द्याहटवा