शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

राज्यात श्‍वेतक्रांती केव्हा?

आपल्या राज्यात दुधाची मागणी व उत्पादन यात बरीच तफावत आहे. दुग्ध उत्पादनाला प्रचंड मागणी असतानासुद्धा आपल्या चुकीच्या धोरणांमुळे, लोकांच्या अनिच्छेमुळे राज्यात श्‍वेत क्रांती घडून येत नाही आहे. गाई-म्हशींच्या दुधाचे उत्पादन घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे गाई म्हधींची घटलेली संख्या होय व या व्यवसायात येण्यास शेतकरी फारसे इच्छूक नाहीत. परिणाम असा होत आहे की दुग्ध व्यवसाय संकटात सापडत चाललाय. राज्यातील श्‍वेत क्रांतीच्या बाधक ठरणार्‍या कारणांचा शोध घेऊन उत्साहापूर्वक वातावरण बनविणे गरजेचे आहे. फार पूर्वी प्रत्येक शेतकर्‍याजवळ निदान एकतरी गाय किंवा म्हैस असायची; पण आज काय स्थिती आहे? गावांमध्ये गाय-म्हशी तुरळक झालेल्या आहेत. श्‍वेत क्रांती फक्त शासनाच्या आदेशानी होणार नसून नागरिकांनीसुद्धा या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलणे फार गरजेचे आहे. शासन तर नागरिकांच्या पाठीशी सदैव उभे असतेच.
राज्यातील लाखो शेतकर्‍यांनी फक्त एक गाय जरी प्रत्येकांनी पोसली तरी श्‍वेत क्रांती होण्यापासून कुणीच रोकू शकत नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा