शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

कागदी लागद्याची गणेश मूर्ती हानिकारक

हल्ली कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक असल्याचा गैरसमज पसरवण्यात येत असून, बाजारात मोठय़ा प्रमाणात कागदी लगद्याच्या मूर्ती बनविल्या जात आहेत. प्रत्यक्षात कागदी लगद्याच्या मूर्तीच्या विसर्जनाने जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झाले आहे.  या प्रदूषणकारी मूर्तीवर बंदी घालण्यासाठी 'राष्ट्रीय हरित लवादा'कडे याचिका  दाखल करण्यात आली होती.  त्यात दिलेली तथ्ये 'राष्ट्रीय हरित लवादा'ने मान्य करत या मूर्तींचा वापर करण्यास बंदी घातलेली आहे. मात्र, प्रशासनाने न्यायालयाच्या या निर्णयाची योग्य अंमलबजावणी केलेली नाही. 
यासंदर्भात मुंबईतील प्रसिद्ध 'शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्थे'ने संशोधन केले. या संशोधनाअंती '१0 किलो कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते', तसेच 'त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅड्मियम, टायटॅनिअम ऑक्साईड असे विषारी धातू आढळले, असे गंभीर निष्कर्ष सांगितले. सांगली येथील 'एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन', या संस्थेने साधा कागद 'डिस्टिल्ड वॉटर'मध्ये टाकून संशोधन केले असता, कागद विरघळवलेल्या या पाण्यात 'ऑक्सिजन'ची मात्रा शून्यावर आल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी घोषित करावी अन्न राष्ट्रीय हरित लवादाच्या निकालाचा अवमान रोखावा, तसेच 'जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाने शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यायला हवा.धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या गणेशमूर्तींचा वापर करण्यास सांगण्याऐवजी गेल्या काही वर्षांपासून श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी 'कृत्रिम हौदात विसर्जन', 'मूर्तिदान करा आणि आता मूर्ती विघटनासाठी 'अमोनियम बायकाबरेनेटचा वापर' यांसारख्या अशास्त्रीय, अघोरी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, या सर्व गोष्टी केल्याने नदीचे प्रदूषण थांबले आहे का, पर्यावरणाचे रक्षण झाले आहे का, असा सवाल उपस्थित होतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा