बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

ठोस निर्णयाची गरज

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी या चळवळीत लोकांचा सहभाग वाढविला पाहिजे. या विषयी लोकांना बोलते केले पाहिजे. दुष्काळाची जाणीव झाल्यास या मोहिमेत जनता निश्‍चित सहभागी होईल. दुष्काळी भागातील लोकांच्या समस्या काय आहेत, त्या शासनाने जाणून घेतल्या पाहिजेत, अशी अपेक्षा करून महाराष्ट्रात जलसाक्षरता मोहीम सुरू करण्याची आवश्यकता आहे. अतिक्रमण, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.  पाणीवाटपावरून राज्या-राज्यांत जिल्ह्या-जिल्ह्यात तंटे होतात.
पण, वाटप समान व्हायला हवे. पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे. पाण्यासाठी माणूस एकमेकांशी भांडत आहे. माणसांपेक्षाही झाडे, जीवजंतूंचा अधिकार पाण्यावर अधिक आहे. पण त्यांचा कुणी विचार करत नाही. पाण्याचे जोपर्यंत समान वाटप होत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा निघू शकत नाही.  महाराष्ट्रातील सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात या परिस्थितीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्यासाठी महाष्ट्रातील लोकांना निर्वासित होण्याची वेळही येऊ शकते. हे टाळण्यासाठी पाण्यावरील अतिक्रमण, प्रदूषण आणि शोषण थांबविले पाहिजे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये यासाठी जलसाक्षरता मोहीम हाती घ्यायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा