शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

होमगार्ड: 100 टक्के रोजगार द्यावा

राज्याच्या पोलीस दलाला बंदोबस्त राखण्यासाठी गृहरक्षक दलाकडे (होमगार्ड) आता मागणी करण्याची गरज नसल्याचा फतवा राज्य शासनाकडे काढला आहे. त्यामुळे आता होमगार्ड लोकांनाबकायम स्वरूपी पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची मुभा मिळाली आहे. मात्र या गृहरक्षक दलाच्या लोकांना पूर्ण वेळ रोजगार मिळण्याची गरज आहे. हे लोक अन्य वेळेस खासगी व्यावसायिक, उद्योजकांकडे काम करतात. त्यामुळे त्यांना बंदोबस्तास हजर राहणे अवघड जाते. या लोकांना 100 टक्के रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे. 
पोलिसांना मदत म्हणून होमगार्ड दलाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात जवळपास 14 हजार 340 होमगार्डची संख्या निश्चित करण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्षात 11हजारच होमगार्ड उपलब्ध आहेत. या लोकांना 50 टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असला तरी हा पुरेसा नाही. आता नव्या आदेशानुसार काही होमगार्ड लोकांना सलग ड्युटी मिळण्याची शक्यता आहे,मात्र अन्य लोकांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. आता उपलब्ध असलेल्या होमगार्ड लोकांमधील तंदुरुस्त लोकांना 100 टक्के रोजगार देऊन कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, त्यामुळे त्यांचा रोजगाराचा कायमस्वरूपी प्रश्न निकालास निघण्यास मदत होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा