शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

चिनी बनावटीची खेळणी वापरू नका


चिनी बनावटीच्या खेळण्यांना भारतात बंदी असूनही त्यांची विक्री केली जाते.स्वस्तात आणि आकर्षक दिसणाऱ्या या च्यायनामेड खेळण्यांना मुलांकडून आणि पालकांकडून मोठी मागणी आहे. भारतातील जवळपास 65 टक्के बाजारपेठ या खेळण्यांनी काबीज केली आहे.या खेळण्यातील शिसे,प्लास्टिक,केडमियम,पीव्हीसी,थेलाइट्स,एजोडायच्या वापरामुळे मुलांना वेगवेगळ्या आजारांना तसेच ऐलारजींना सामोरे जावे लागते,सेंटर,ऑफ सायन्स एन्ड एन्व्हायर्मेंट यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे.या संस्थेने मोठ्या शहरांमध्ये याचे सर्व्हेक्षण केले आहे. त्यांच्या सर्व्हेक्षणामुळे या खेळण्यांमध्ये वापरण्यात आलेल्या विविध घटकांमुळे तर काही घटकांतील अविघटनशील पदार्थांमुळे मुलांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो.
तोंडातून सतत लाळ बाहेर येणे,घशाला कोरड पडणे,धाप लागणे,खोकला अशा तक्रारी असल्याचे आढळून आले आहे.कमी दर आणि आकर्षक रुपामुळे या खेळण्यांकडे आकृष्ट होणाऱयांची संख्या वाढली आहे.लहान मुलींच्या खोटया दागिन्यांमध्ये शिसयाचे काही अंश असतात.त्यामुळे त्वचाविकार होउ शकतात.असेही सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. भडक रंगाच्या खेळण्यात केडमियम असल्याने ते मेंदूच्या वाढीमध्ये अडसर निर्माण करू शकतात.रबरी खेळण्यांतील पीव्हीसी या घटकांमुळे चायना मेड रबरी खेळणी श्वसनाविकारासाठी कारण ठरतात. चामड्याचा वापर केलेल्या वस्तूंमध्ये इंजोडाय असते.टी फुफ्फुसांवर परिणाम करते.तर प्लास्टिकला मऊ करण्यासाठी वापरण्यात येणारे थेलाईटस हे एलर्जी ,दमा यासारख्या आजारांना निमंत्रण देतात,असे या संस्थेच्या तज्ज्ञ् मंडळींचे आहे. त्यामुळे ही खेळणी विकत घेऊ नये.पालकांनी याबाबतीला अट्टाहास मोडून काढावा.पालकांनी चायनामेड खेळणी आपल्या पाल्यांना विकत घेऊन देऊ नये.शासनानेही ही खेळणी जिथे मिळतात,तिथे छापा घालून त्यांच्यावर कारवाई करावी. मच्छिन्द्र ऐनापुरे,जत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा