शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

दिवाळी सुरक्षित साजरी करा


दिवाळीची लगबग सुरू झाली असून, सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे. दिवाळीचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. दिवाळीच्या आनंदात कुठलेही विघ्न नको. म्हणून, सुरक्षित दिवाळी साजरी करा. दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे. अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी महत्त्वाची आहे.

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

भेसळ माफियांना आवर घाला


दिवाळी हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे. या महत्त्वाच्या भारतीय  सणाच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या पदार्थांसह मिठाई, तेल दूध व दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर,तूप यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. आरोग्याला घातक असणारे घटक मिसळून नफा कमावणारी नवी माफिया जमात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. शहाराबरोबरच ग्रामीण भागातही हा माफियाराज बळावत चालला आहे. त्यामुळे या काळात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लक्ष देण्याची गरज आहे.

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

बाभूळ झाड वाचवा

ग्रामीण भागात कोरड्या, तसेच पाणथळ जागी हमखास आढळणारा वृक्ष म्हणजे बाभूळ. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उभे असलेले बाभळीचे झाड अनेक ठिकाणी पाहायला मिळायचे. मात्र, दिवसेंदिवस सरपणासाठी या झाडाची कत्तल होत असल्याने त्यांच्या संख्येत घट होत आहे. काही वर्षांपूर्वी बाभळीची वने आढळायची. ऐन उन्हाळ्यात हा जनावरांसाठी आणि माणसांसाठी हक्काचा निव-रा असायचा. बाभळीच्या शेंगा व पाला म्हणजे शेळ्या-मेंढ्यांचे आवडते खाद्य. त्यामुळे शेंगा खावू घालून मेंढपाळ झाडाच्या सावलीत विसावयाचे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे झाडातून बाहेर पडणारा चिकट द्रव म्हणजे डिंक जमवायला अनेक मुले यायची. अनेक कुटुंबांची गुजरानही डिंक विकून व्हायची. त्यामुळे या झाडांना विशेष महत्त्व होते.

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

सणांमुळे सामाजिक ऐक्य


सुख, समाधान, शांतता आणि आनंदाची पर्वणी म्हणून सण साजरे केले जातात. सणांमुळे आर्थिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि बांधीलकीही जपली जाते. त्यामुळे सणांचा आनंद मनमुराद घ्यायला हवा. सणांची निर्मिती होण्यामागे पूर्वीपासून काही शास्त्रोक्त कारणं आहेत. शीख धर्मियांत गुरुपुरव, बैसाखी, होला महल्ला, दरबारे खालसा या सणांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक धर्मातील सणांद्वारे धर्मनिरपेक्षतेचा आणि संतांच्या सेवेचा संदेश दिला आहे. ख्रिश्चन धर्मात प्रामुख्याने ईस्टर हा सण साजरा करतात. प्रभू येशच्या जन्माचे स्मरण म्हणून ख्रिसमस साजरा होतो.

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

माहिती अधिकार कायदा लोकशाहीचा पाचवा स्तंभ

सध्या माहिती तंत्रज्ञान आणि माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ झाले असून या माध्यमांचा अधिकाधिक उपयोग करून समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता आहेआज विविध कारणांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता धोक्यात आली आहेत्यामुळे समाजातील जागल्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि माहिती अधिकाराचा वापर करून अधिकाधिक माहिती गोळा करून त्याचा विनियोग समाजासाठी करावासोशल मिडियाप्रसारमाध्यमातून ही माहिती लोकांपर्यंत जायला हवीतसेचसमाजात जनजागृती करणे आवश्यक आहेगावोगावी व्याख्यानेप्रदर्शने भरवली जायला हवीतलोकांच्या अडाणीपणाचा फायदा घ्यायलाच काही लबाड लोक टपले आहेतअशा लांडग्यांपासून गरीब जनतेची सुटका करून घ्यायला हवीयासाठी माहिती अधिकाराचा अधिकाधिक प्रसार होण्याची आवश्यकता आहेआणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माहिती संरक्षण विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या श्रीकृष्ण समितीने व्यक्तिगततेच्या मुद्द्याचा वापर करून माहिती अधिकार कायद्यात बदल सुचवले आहेतत्यामुळे भ्रष्टाचारी अधिकार्यांची कुठलीही सार्वजनिक छाननी समितीने केलेल्या सूचना अंमलात आणल्यास करता येणार नाहीपरिणामी भ्रष्टाचाराला मोकळे रान मिळणार असून हे अत्यंत घातक आहेन्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करण्याचा अधिकार सामान्य नागरिकांना लोकशाहीने दिला आहेपरंतुप्रत्येक सामान्य नागरिक दिल्लीमध्ये जाऊन याचिका दाखल करू शकत नाही

भीक मागणारी मुले आणि कायदा

लहान-मोठ्या शहरांमध्ये लहान मुले भीक मागत असताना पाहात असतो. खरे तर मुलांनी शिकावे म्हणून बरेच कायदे झालेले आहेत. बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायद्यानुसार अशा मुलांना संरक्षण व काळजीची गरज आहे. अशा मुलांसाठी कायदा व शासकीय योजना आहेत, लाखो रुपयांच्या अनुदानावर बालगृह, सुधारगृह चालतात. त्यांच्यासाठी काम करणार्‍या सरकारी यंत्रणेवर लाखो रुपये खर्च होतात. मग त्या मुलांना रस्त्यावर भिक मागायची वेळ का येते? कित्येक वर्षांसून महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग आणि नागपूर जिल्हा बालकल्याण समितीचे पुनर्गठन झालेले नाही. राज्यातील बालगृह, बालसुधारगृह, आर्शमशाळा, सरकारी वसतीगृह, अनाथ आर्शमांची स्थिती दयनिय व अमानविय आहे. दररोज वृत्तपत्रातून अशा संस्थांमध्ये लैगिक शोषण व इतर सुविधांचा अभाव, तेथून मुलांचे पलायन यासंदर्भात मोठमोठ्या बातम्या प्रकाशित होतात. ज्या वातावरणात मुलांना आनंदी व सुरक्षित वाटणार नाही, अशा ठिकाणांहून ते पलायन करतीलच, आणि जी मुले तेथे राहतात, त्यांच्या व्यथा आणि सरकारी यंत्रणा याबद्दल सविस्तर संशोधनाची गरज आहे.

‘रासायनिक खतांना महा सोनखत हाच पर्याय’

रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत तर खराब होतोचशिवाय मानवी आरोग्यावरदेखील  विपरीत परिणाम होतोसोनखताच्या वापरामुळे जमिनीसह मानवाच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाहीरासायनिक खतांच्या बरोबरीने सोनखतामुळे उत्पन्न मिळू शकतेत्यामुळे महा सोनखत हे रासायनिक खतांना उत्तम पर्याय असून शेतकर्यांनी याचाच वापर करण्याचा संकल्प सोडायला हवापंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान देशभरात लोकचळवळीत परावर्तीत केले आहेमहा सोनखत प्रकल्प स्वच्छ भारत अभियानाचे पुढचे पाऊल असून या माध्यमातून महिला बचत गटांसह अनेकांना चांगली रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहेदेशभरात सुरू असणार्या स्वच्छ भारत अभियानामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्पप्नांची पूर्तता होत आहेरासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीसह मनुष्याच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेतयामुळे जमिनी नापिक होत असून मानवाला विविध दुर्धर आजारांचा सामना करावा लागत आहेरासायनिक खतांना सोनखत हा चांगला पर्याय आहेमहिला बचत गटांच्या माध्यमातून सोनखत प्रकल्प राबवण्यात यावाशिवाय यासाठी बचत गटांना काही सवलती द्याव्यातयामुळे बचत गट पुढे येतीलमहा सोनखत प्रकल्पाचा सामान्य शेतकर्यांना फायदा होणार आहे

अवयवदान ही चळवळ व्हायला हवी

जगभरात विविध क्षेत्रासह वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली आहेविदेशातील बहुतांश लोक अवयवदान करतातत्याचा त्यांच्या देशातील गरजू रुग्णांना फायदा होतोत्या तुलनेत भारतात अवयवदान प्रक्रिया खूप मागे आहेयाबाबत जनजागृती अतिशय कमी आहेआपल्या देशात अपघातजीवनशैली बदल यामुळे उद्भवणारे आजार याचा परिणाम म्हणजे काहींचे अवयव निकामी होत आहेत आहेतपरिणामी अवयवदानाला मागणी वाढली आहे,परंतु त्याची पूर्तता होताना दिसत नाहीत्यामुळे अवयवदान हा उपक्रम न होता याची चळवळ व्हायला हवी आहेसमाजाच्या तळागाळापर्यंत अवयवदानाविषयी जनजागृती होण्याच्यादृष्टीने सर्वच माध्यमाकडूनसमाजसेवी संस्थांकडून प्रयत्न व्हायला हवेततरच यातून काहीतरी चांगले साकार होणार आहे.  एखाद्या रुग्णाचा मेंदू मृत झालातर त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय त्याच्या नातेवाईकांनी घ्यायला हवालोकांनी जीवंतपणीच याची पूर्तता करून आपल्या नातेवाईकांना याची कल्पना द्यायला हवीयासाठी प्रत्येकाने अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे

नागरिकांकडून ई कचर्‍याची साठवणूक


आपल्याकडे बाजारात नव्या वाढीव क्षमतेसह सातत्याने नव-नवे टीव्ही,कॉम्प्युटरलॅपटॉपमोबाईल यांशिवाय अन्य डिवाईस उपलब्ध होत आहेतत्यामुळे साहजिकच जुने डिवाईस एक तर अडगळीत जातात किंवा त्याचा वापर कमी होऊन ते खराब होतातपण इतके झाले तरी ते घरातच जपून ठेवले जातातअलिकडच्या काळात प्रत्येकाच्या घरात चालू-बंद असलेले चार-पाच मोबाईल सहज दिसतीलकारण त्याची विल्हेवाट कशी लावायची आपल्याला माहितीच नाहीएक्सचेंजमध्ये काही वस्तू जातात,मात्र त्याला एक्सचेंज ऑफर नसेल तर मात्र त्या वस्तू आपल्याकडे पडून राहतातकाही खराब डिवाईस रस्त्यावरच फेकून दिल्या जातातत्यामुळे आपण आपल्या घरात आणि दारात ई-कचरा करून पर्यावरण धोक्यात घालवत आहोतया वस्तू जाळल्यास त्यातून विषारी धूर बाहेर पडून त्याचा आपल्याच शरीराला त्रास होतोखरे तर अशा वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.पण आपण त्याकडे अजूनही गांभिर्याने पाहत नाहीघरातल्या आणि इलेक्ट्रॉनिक दुकानांमधून अशा वस्तूंचा  -कचरा वाढत चालला आहे.

कृषीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांकडे वळावे

शेतीशी निगडीत विविध पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांकडे शेतकर्‍यांनी आता वळणे गरजेचे आहे.कारण  याव्दारे शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्नाची हमी मिळू शकते.शेतीपुढील विविध आव्हानांमध्ये वातावरणातील बदल हा महत्वपूर्ण घटक असून विषम पर्जन्यमान हा त्याचाच परिणाम आहे. शेतीशी निगडीत सर्व संबंधित विभाग व घटकांनी समन्वयाने कामे केली पाहिजेत. शेतीशी निगडीत सर्व कृषी भागधारकांसाठी कार्यशाळांचे आयोजन केल्यास शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. कृषी अधिकार्‍यांसाठीच्या प्रशिक्षणाची आखणी करतांना शेतकरी व कृषी भागधारकांच्या अपेक्षा आणि गरजा जाणून घेणे नक्कीच महत्वपूर्ण आहे. प्रगतीशील शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात केलेले नवनवीन प्रयोग अन्य शेतकर्‍यांपर्यत पोहचविल्यास ते अधिक प्रभावीपणे पोहचतील. यासाठी क्षेत्रभेटी व क्षेत्रप्रशिक्षण यावर भर दयावा. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध कृषी विषयक घटकांची सप्रयोग माहिती देणे उपयुक्त  ठरणार आहे. शेतकरी आणि विविध कृषी भागधारकांच्या अपेक्षा जाणून घेणे तसेच अधिकारी व प्रशासकीय यंत्रणा यांची त्याच्याशी सांगड घालणे गरजेचे आहे.

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

भारतात मृत्यू दर आटोक्यात आणण्याची गरज


भारतात आरोग्य सेवा कुचकामी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये यांची अवस्था वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी आणि औषधांचा तुटवडा आणि सुविधांअभावी अत्यंत केविलवाणी झाली आहे. आरोग्याची सरकारी यंत्रणा मृत्यू शय्येवर असताना खासगी दवाखाने मात्र नागरिकांना लुटताना दिसत आहेत. साहजिकच देशातील वैद्यकीय सेवा महागडी बनली आहे. ही सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असून त्यामुळे योग्य उपचाराआभावी भारतातला मृत्यू दर हजार जन्मांमागे 30 असा आहे.