सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

भारतातील मुलांमध्ये कमी उंचीची समस्या


पोषण आहार, अन्य आजार यामुळे भारतातल्या मुलांची उंची वाढताना दिसत नाही. सध्याच्या परिस्थितीला या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. सरकार या आजाराचा शोध घेत असून त्यादृष्टीने पावले उचलत असले तरी उंची मोजण्याच्या मापदंडाची समिक्षा करण्याची आवश्यकता आहे. अन्य देशातील मुले आणि आपल्या देशातील मुले यांच्या उंचीत मोठी तफावत आहे. मात्र तरीही भारतीय मुलांच्या उंचीचे एक मापदंड ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार सर्व्हेक्षण करून मुलांवर उपचार करण्याची गरज आहे. एवढे मात्र निश्चित की, विविध कारणांमुळे आपल्या देशातील मुलांची उंची कमी होत चालली आहेग्लोबल न्यूट्रिशियन रिपोर्ट 2018 नुसार देशात अशा कमी मुलांची संख्या 4.66 कोटी आहे. या नंतर नायझेरियाचा  (1.39)क्रमांक लागतो.
त्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक (1.07) लागतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण -4 (एनएफएचएस-4) नुसार पाच वर्षापेक्षा कमी वयातील 38.4 टक्के मुलांमध्ये बुटकेपणा आहे. म्हणजेच वयाच्या मानाने यांची उंची कमी आहे. याशिवाय 21 टक्के मुले अशी आहेत की, त्यांचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने कमी आहे. बिहारमध्ये सर्व्हेक्षणानुसार पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या उंचीची समस्या 48.3 टक्के आहे. देशातील विविध भागातील भारतीय मुलांची मानव विज्ञान संरचना बदलत आली आहे. असे असले तरी मुलांची उंची मोजण्याचे एकही मानदंड नाही. सरकार हार्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या मदतीने उंची मोजण्याचा प्रयत्न करत आहे. आंतराष्ट्रीय मानदंडाचे भारतीयकरण कसे करायचे असा प्रश्न आहे. युरोपातील मुलांची उंची आपल्या देशातील मुलांच्या उंचीपेक्षा जास्त आहे.याशिवाय मुलांवर उपचार करणे कठीण आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत नाशिक 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा