बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

युवकांनी सोशल मीडियाचा जपून वापर करावा


राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणूक काळात सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर व्हावा. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये. यादृष्टीने सोशल मीडियावर पोस्ट होणार्‍या मजकुरावर सायबर सेलद्वारे नियंत्रण ठेवण्यात येत असून युवकांनी स्वत:चे करिअर सांभाळावे. युवकांनी आपले करिअर धोक्यात न घालता कोणत्याही वादग्रस्त पोस्ट पाठवणे, तयार करणे यापासून अलिप्त राहयला हवे.
नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साइटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहे. नागरिकांनी अशा पोस्ट व्हायरल अथवा शेअर करू नये. कारवाईला सामोरे जावे लागेल. युवकांनी निवडणुकीच्या काळात अशा पोस्ट पाठवणे. फॉरवर्ड करणे. त्यावर प्रतिक्रिया देणे टाळावे. स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. दिवसभरात फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साइटवर असंख्य संदेश प्राप्त होत असतात. अनेक वेळा हे संदेश न वाचता व खातरजमा न करता फॉरवर्ड केले जातात.  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला येणारे मेसेज काळजीपूर्वक वाचून खातरजमा करूनच पुढे पाठवावे. कुठल्याही व्यक्तीची, समाजाची, महिलांची, राजकीय व्यक्तींची, धमार्ची प्रतिमा मलिन करणारे मेसेज फॉरवर्ड करू नये. बेनामी संघटना, समाजकंटक व असामाजिक तत्त्व यांच्या नावाने फिरत असलेल्या वादग्रस्त पोस्ट शेयर न करण्याची दक्षता घ्यायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा