रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा


विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रोसिजर सुरू झाली आहे. इच्छूक मंडळी यापूर्वीच विविध माध्यमातून आपल्या नावाचा उदोउदो चालवला आहे. कुठे बंडाळी,कुठे पक्ष बदल अशा घटना घडायला लागल्या आहेत.अशा परिस्थितीत आपण काय करावे, असा प्रश्न सर्वसामान्य मतदाराला पडला असेल. राजकारणात प्रामाणिक, समाजसेवक यांचे काही चालत नाही. कारण यांच्याकडे मागे लोकांची गर्दी नसते. आपल्या देशात सर्वात मोठा प्रश्न आणि कळीचा मुद्दा आहे तो बेरोजगारीचा. सव्वाशे कोटी इतक्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतात तितकीच प्रचंड बेरोजगारी आहे.
नोकरी शोधून शोधून शेवटी पुढाऱ्यांच्या दावणीला जाऊन बेरोजगार काहीही करायला तयार होतात. साहजिकच राजकारण्यांच्या लोकांच्या मागे अशा लोकांचा काबिला असतो. साहेब,दादा,अण्णा, मालक म्हणत ही माणसे आपल्या नेत्याला एका नव्याच उंचीवर नेऊन ठेवत असतात. निवडणूक काळात दारोदार फिरून हात जोडणारी ही मंडळी निवडून आल्यावर सामान्य लोकांना हुजरेगिरी करायला लावतात. कटकारस्थान करून प्रामाणिक लोकांना आपल्या मनाप्रमाणे करायला लावतात. पाच वर्षात गडगंज संपत्ती जमवणाऱ्या लोकप्रतिनिधींना अशा बेरोजगार लोकांचा मोठा हातभार लागतो. बेरोजगारांची फळी आपल्या मागे राहावी यासाठीच देशात बेरोजगार निर्माण केले जात आहेत, अशी शँका येते. याचमुळे राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्ती शिरली आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना तो गुन्हेगार किंवा त्या पार्श्वभूमीचा नसावा,याचा विचार करायला हवा. आपल्याला कुठलाच उमेदवार पसंद नसेल तर नाटो बटणाचा उपयोग करायला हवा. फक्त मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावावा. आपले कर्तव्य पार पाडावे. त्यातल्या त्यात विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराचा विचार करायला हवा. यासाठी त्याची मागील कामाची पार्श्वभूमी पाहायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा