गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

सरकारने जगलेल्या झाडांचा हिशेब द्यायला हवा


राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्याचे  33 टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि, महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ 20 टक्के असल्याने लक्षणीय वाढ करण्यासाठी येणाऱ्या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.
एक जुलै 2016 रोजी एका दिवसात दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असताना प्रत्यक्षात दोन कोटी 82 लाख झाडे लावल्याचा, 2017 मध्ये साडेतीन कोटींचे उद्दिष्ट असताना पाच कोटी 43 लाख झाडे लावल्याचा, 2018 मध्ये 13 कोटींचे उद्दिष्ट असताना 18 कोटी 88 लाख झाडे लावल्याचा वनमंत्री मुनगंटीवार यांनी अलीकडे दावा केला आहे.  एकूण 50 कोटी वृक्षलागवडीतील तिसरा टप्पा 33 कोटींचा आहे.  मात्र या लावलेल्या झाडांचा आणि संवर्धनाचा आकडा जनतेसमोर यायला हवा. ही कोटी कोटींची उड्डाणे पचनी पडायला जड जात आहेत.शासकीय यंत्रणेच्या आधारावर ही झाडे सरकारने लावली आहेत. मात्र गेल्या चार वर्षांत लावलेल्या झाडांचा हिशोब आणि संवर्धित झाडांची माहिती समोर यायला हवे, तरच महाराष्ट्राचे वन क्षेत्र उद्दिष्ट साध्य झाला म्हणायला हरकत नाही. राज्य सरकारने मात्र केवळ कोटय़वधी झाडे लावल्याचे जाहीर केले असले तरी त्यातील किती जगली याची काहीही माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळेच, सरकारची ही योजना थोतांड असल्याची चर्चा जी सुरू आहे, योग्यच आहे, असे म्हटले पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली) 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा