बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

आरोग्यदायी सवयी आत्मसात करा


ए.डी.आर.म्हणजे अँडवर्स ड्रग रिअक्शन. संपूर्ण जगामध्ये मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ए.डी.आर.आहे. आपण ज्या ऑलोपॅथिक औषध घेतो. त्यांचा आपल्या स्वास्थावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते. सर्व प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. आय.सी. सी.यु. युनिट्स आहेत. मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत. नेओनेटलॉजि युनिट्स आहेत. तिथे लोकांचे आरोग्य खराब आहे,असे २00७ च्या सर्वेक्षनामध्ये नमूद करण्यात आले आहे. तेव्हा ऑलोपॅथी औषधांचा कमित कमी वापर करून स्वास्थ्य अबाधित राहील, अशा आरोग्यदायी सवयी सर्वांनी आत्मसात कराव्या. तसेच पारंपरिक आयुर्वेदाचा अंगीकार करायाला हवा.
अँालोपॅथीने तत्काळ आराम पडतो.परंतु, त्याचे साईड इफेक्टस होतात. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणार्‍या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी ११ लाख लोकांना मधुमेह मृत्यू होतो.'ओव्हर डोस अमेरिका' या पुस्तकाचे लेखक डॉ.जॉन अब्राहम या सुप्रसिद्ध अमेरिकन लेखकाने संपूर्ण जगाला पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की,अमेरिकेसहित संपूर्ण जगाचे स्वास्थ्य ऑलोपॅथिक औषधांमुळे कसे खालावत चालले आहे.आज संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्टअटॅक अथवा अपघात नसून, उपचारादरम्यान दिल्या जाणार्‍या ऑलोपॅथिक औषधी आहेत. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वत: घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच करू शकणार नाहीत. इतर कोणत्याही कारणापेक्षा औषधांच्या दुष्परिणामांनी मरणार्‍यांची संख्या पाचपट जास्त आहे. मानवी प्रतिकार क्षमता किंवा आजार ठिक करण्याची अंगभूत क्षमता यांवर ऑलोपॅथिक डॉक्टरांचा विश्‍वास नाही.चिकित्सा जगतातील व्यापारीकरणामुळे टेक्नॉलॉजिमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.ऑलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदानच्या बाबतीत अचुक आहे, असे म्हटले जाते. परंतु, हा सुद्धा एक भ्रम आहे. त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असतो.अनावश्यक रक्त,लघवी तपासणी, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एन्डोस्कोपी अँजिओग्राफी ई.अनेक तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाध्य केले जाते. यापैकी ९0टक्के तपासण्यांची रुग्णांना गरज नसते.
डॉक्टर स्वत: आपल्या अनुभव व कौशल्याच्या आधारे योग्य निदान करू शकतात. जे शेकडो तपासण्यांपेक्षा जास्त अचूक असू शकते. या तपासण्यांमागे ५0 टक्केपर्यंत कमिशन मिळते हे अमीर खानने सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमात जगजाहीर केले आहे. यात काही अपवाद नसतील असे नाही. त्या करिता पारंपररिक आयुर्वेद उपचार, योग्य आहार व विहार हे फायद्याचे आहे.याकरिता स्वत: चे स्वास्थ्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी सर्वांनी आत्मसात करायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा