गुरुवार, ४ जून, २०२०

आम्ही सृष्टीचे रक्षक...

क्षणिक आनंदासाठी मानवाने केलेल्या कृत्याने व मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे आज पर्यावरणाचा र्‍हास झाला. निसर्गातील १0 लाख प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आपले अनेक शहरे ही वायू प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषित मानल्या जात आहेत. जलप्रदूषण, घनकचरा याही समस्या आहेतच. मात्र, लॉकडाऊन काळात शहरातील हवेचे प्रदूषण जरा कमी झाले. त्यामुळे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'आम्ही सृष्टीचे रचिता नाही तर रक्षक आहोत..' ही भावना जोपासणे गरजेचे आहे. 'जीवे जीवेश्य जीवनम:' असे म्हटल्या जाते. अर्थात या सृष्टीतील प्रत्येक जीव हा अन्नसाखळीत एकमेकावर अवलंबून आहे.
मात्र, विश्‍व पर्यावरणाच्या दोन दिवसापूर्वी केरळमधील गर्भवती हत्तीनीला जेवण देताना अननसामधून फटाके देण्यात आले. या विकृतीमुळे तीचा जीव गेला. यावर्षी विश्‍व पर्यावरण दिवसासाठी 'बायोडायर्व्हसीटी-टाईम फॉर नेचर ही' थीम दिलेली आहे. खरे तर निसर्गासाठी प्रत्येकाने आपला वेळ देऊन भविष्य सुरक्षीत करता येईल. या धर्तीवर अनेक शहरांमध्ये काही बदल घडल्यास त्यांच्या पर्यावरणातही निश्‍चित बदल घडतील. शहरांमध्ये होत असलेल्या अतिरिक्त बांधकाम आणि विकासाच्या कामाने येथील 'एअर क्वालीटी इंडेक्स' धुळीकणामुळे घसरत चालला आहे.. तसेच जलप्रदुषणाचेही तसेच आहे.
शहरांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाचे किंवा अन्य स्रोत यांचे पाणी पिण्याजोगे नाही. दर लिटर पाण्यामध्ये ६ मीलीग्राम ऑक्सीन असणे गरजेचे असते. ही मात्रा कमी आढळून येते. नद्यांतून केवळ सिव्हेज वाहत असल्याने त्यांची दैयनिय अवस्था झाली आहे. जागोजागी सेन्ट्रालाईज सिव्हेज सेक्टर प्लॉंट बनविले तर वहन करण्याचा खर्च वाचेल. यातील पाणी अर्धे नदीत जाईल व अर्धे रियुज करता येईल. 'प्लास्टर ऑफ पॅरीस'च्या मूर्ती केवळ कृत्रिम तलावात विसर्जीत कराव्यात. मानवाने आपले आद्य कर्तव्य मानुन पर्यावरणाच्या विरोधात न जाता रक्षक म्हणून कार्य केले तरच शाश्‍वत विकास घडेल. येणार्‍या पीढीला एक सुरक्षीत व चांगले पर्यावरण प्रदान करता येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा